सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले
By नामदेव मोरे | Updated: March 16, 2023 18:40 IST2023-03-16T18:38:53+5:302023-03-16T18:40:17+5:30
सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिट चोरणाऱ्यास पकडले.

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये बुधवारी पाकिट चोरी करून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले आहे. सलाउदीन शेख असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्यासह साथीदाराविरोधात वाशी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मानखुर्द येथे राहणारा अमन गुप्ता हा तरूण नेरूळ रेल्वे स्टेशन बाहेर व्यवसाय करतो. बुधवारी १२ वाजता तो लोकलने घरी जात असताना सानपाडा रेल्वेस्टेशनमध्ये दोन चोरट्यांनी त्याच्या खिशातील ५ हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकिट चोरून सानपाडा स्टेशनमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. अमन ने त्या दोघांचा पाठलाग सुरू केला. आराडा - ओरड सुरू होताच साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी सलाउदीन शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याचा साथीदार आफनान खान पाकिट घेऊन पळून गेला आहे. हे दोघेही गोवंडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.