जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:45 PM2022-11-14T21:45:33+5:302022-11-14T21:46:17+5:30

विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे

Voting for 2 Labor Trustee Posts of JNPA, Future of 652 Workers Tried | जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

Next

मधुकर ठाकूर

उरण :  चारही संघटनांच्या जोरदार प्रचारानंतर मंगळवारी (१५) जेएनपीएच्या दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी गुप्त मतदानाने निवडणूक होणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी ॲथोरिटी ॲक्ट स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. पहिल्यांदाच तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या निवडणुकीत बंदरातील मान्यता प्राप्त चार कामगार संघटना सहभागी झाल्या असून ६५२ कामगार ट्रस्टीपदाच्या निवडणुकीत इच्छुकांचे भविष्य ठरविणार आहेत. 
   
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी प्राधिकरण 

जानेवारी २०२२ पासून अस्तित्वात आल्यानंतर बंदराचे कामकाज या ॲथोरिटी ॲक्टनुसारच सुरू झाले आहे.प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या दोन कामगार ट्र्स्टींची मुदत वर्षांपूर्वीच तर आणखी मार्च २०२२ पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढही संपुष्टात आली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी निवडणूक घेणे अपेक्षित होते.दरम्यान केंद्रीय श्रम आयुक्तांनी दोन कामगार नियुक्त ट्र्स्टी पदासाठी येत्या २ ऑगस्ट रोजी गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याआधीच निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने जाहीर करण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यात नामुष्कीची वेळ जेएनपीए प्रशासनावर आली होती. पुन्हा  निवडून लांबणीवर पडल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे. 
    
कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबरला रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी जाहीर केल्यानंतर जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष माजी ट्र्स्टी दिनेश पाटील, न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी भुषण पाटील, जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी रविंद्र पाटील, न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष एम.के.पाटील  या मान्यता प्राप्त कामगार संघटना आपल्या कामगार सहकाऱ्यांच्या मदतीने निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दिवाळी पासुनच या चारही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे.प्रथम व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या कामगार संघटनेचे दोन कामगार ट्र्स्टींना तीन वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सर्वच बाबतीत झोकून देऊन प्रचाराचा धुरळा उडवला होता. मात्र, जेएनपीएच्या सुमारे ५०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त उरलेले सुजाण ६५३ कामगार कोणत्या दोन कामगार संघटनेला मतदान करतात यावरच दोन कामगार ट्र्स्टींच्या विजयाचे भविष्य अवलंबून आहे.निवडणुकीनंतर त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मागील दोन निवडणुकीत संघटना विहित मिळालेली मते 

१ -  जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष माजी ट्र्स्टी दिनेश पाटील ( २०१७- ६०२ मते ), (२०२०- ५३४ मते ) 
२-न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी भुषण पाटील ( २०१७- २४४ मते )२०२०- २८२ मते )  

 ३--जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी रविंद्र पाटील -२०१७- ३६० मते ) ( २०२०- २४७ मते ) 

४---न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष एम.के.पाटील (२०१७- ११० मते ), ( २०२०- १६० मते )

Web Title: Voting for 2 Labor Trustee Posts of JNPA, Future of 652 Workers Tried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.