शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

मतदार याद्यांमधील घोळ सुरूच; इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 23:49 IST

निवडणूक विभागाकडे केल्या तक्रारी

नवी मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ वर्षानुवर्षे वाढतच चालल्याने त्याबाबत सर्वपक्षीयांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तर एक महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ असल्याने अनेक मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात फेकले गेले आहेत. असे घोळ जाणीवपूर्वक केले गेल्याची शक्यता मतदारांकडून वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात राजकीय घडामोडी सुरू असतानाच, नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याचे समोर आले आहे. अशा चुका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केल्या गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये अनेक प्रभागांतील इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळण्यात आली आहेत. तर अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसºया प्रभागातील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकारात एकाच कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रभागात विभागल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी गावठाणातील मतदार कॉलनीतल्या प्रभागात नोंदवले गेले आहेत. यामुळे प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधत मतदानासाठी चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील घोळामुळे आपल्या राहत्या प्रभागातील लोकप्रतिनिधी निवडीचा हक्क गमावून दुसºया प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा प्रसंग मतदारांवर ओढावणार आहे. याची तीव्र नाराजी मतदारांकडून व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीवेळी मतदारांची नावे योग्य प्रभागात असताना, अचानक त्यामध्ये बदल झालेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यावरून घणसोली नोडमधील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. या वेळी भाजपचे कृष्णा पाटील, सुरेश सकपाळ, सचिन शिरसाठ, विजय खोपडे, नितीन रांजने, राजू गावडे, सखाराम सुर्वे, मंगेश साळवी आदी उपस्थि होते. यामध्ये त्यांनी मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेऊन तशा पद्धतीचे पत्र पालिकेला दिले आहे. यानंतरही मतदार याद्यांमध्ये घोळ कायम राहून एका प्रभागातील मतदार दुसºया प्रभागात नोंदले गेल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा मतदारांनी घेतला आहे. घणसोलीतील वैभवशाली सोसायटीतील १८० पैकी केवळ ४० मतदारांची नावे असून उर्वरित १४० मतदारांची नावे कोणत्याच यादीत सापडत नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे, तर प्रभाग ३३ मधील मतदार ३६ मध्ये तर ३४ चे मतदार इतर प्रभागांच्या यादीत गेले आहेत.

सानपाडा येथेही ७४ क्रमांकाच्या प्रभागातील मतदार ७५ अथवा ८३ प्रभागातील यादीत नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये शेकडो मतदार एका प्रभागातून दुसºया प्रभागात फेकले गेले आहेत. या प्रकरणी शिरीष पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. तर वाशीत प्रभाग ६२ मधील मतदार प्रभाग ५८ मध्ये अथवा इतरत्र ढकलले गेले आहेत. या प्रकरणी विजय वाळुंज यांनी संताप व्यक्त करत पालिकेकडे तक्रार केली आहे. तर मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम यांनीही मतदार याद्यांमधील घोळावर आक्षेप घेतला आहे.

याद्यांमधील घोळाच्या आडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून त्यासंबंधीचे पुरावे पालिकेकडे सादर करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. एका प्रभागातून दुसºया प्रभागात मतदार नोंदणी झाल्याचा फटका स्थानिक उमेदवारांना बसणार आहे. यामुळे मतदार याद्यांमध्ये घडलेला घोळ सुधारून सर्व मतदार त्यांच्या मूळ प्रभागात नोंदित करावेत, अशी मागणी होत आहे.सूचना व हरकतींसाठी १६ मार्चपर्यंत मुदतप्रारूप मतदार याद्यांसंदर्भात सूचना व हरकती करण्यासाठी पालिकेने १६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यादरम्यान शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही पालिका मुख्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे पालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबई