शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाशी-कोपरखैरणे रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:43 IST

वाशी-कोपरखैरणे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी-कोपरखैरणे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने टप्प्याटप्प्यावर डबकी तयार झाली आहेत. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने वाहने आपटून अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे.गेली आठ दिवस संततधारेने अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाशी-कोपरखैरणे दरम्यानचा रस्ता तर ठिकठिकाणी उखडला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बहुतांशी वाहने वाशी-कोपरखैरणे मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. या मार्गावरील ब्लू डायमंड चौकात कोपरखैरणेकडून येणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळून अपघात होत आहेत. ब्लू डायमंड चौकातून डावीकडे वळून कोपरी सिग्नलकडे जाणारा आणि तिकडून चौकाकडे येणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर वाशी सिग्नलजवळील उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.