शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष हातांनी साकारल्या १०,००० राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात रेखीव नक्षी, कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत.

नवी मुंबई : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारात रेखीव नक्षी, कलाकुसरीने नटलेल्या आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. या राख्यांची निर्मिती अनेक संस्थांकडून करण्यात येत असून, अपंगत्वावर तसेच गतिमंदत्वावर मात करीत विशेष मुलांनी यापैकी बहुतांश राख्या तयार केल्या आहेत. सजावटीचे विविध प्रकारचे साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या विविधरंगी सुंदर अशा राख्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.हातातील कौशल्य आणि आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी सुंदर, आकर्षक अशा ४० डिझाइन्सच्या १०,००० राख्या तयार केल्या आहेत. ही मुले स्वावलंबी बनावीत, तसेच त्यांच्या बुद्धिमतेचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष मुलांनी तयार केलेल्या या राख्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विक्र ीसाठी ठेवल्या जातात. या राख्या खरेदी केल्यानंतर मुलांच्या चेहºयावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो, अशी माहिती शाळेच्या संस्थापिका शिरीष पुजारी यांनी दिली. राख्यांबरोबरच सजावटीच्या वस्तू, तोरणे, तरंगत्या मेणबत्त्यादेखील विद्यार्थी तयार करत असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली.विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पणत्या, कंदील, कागदी पिशव्या, दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत आणि वस्तूंचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. शाळेतील फाल्गुनी व्होकेनशनल युनिटच्या वतीने या मुलांना वर्षभर विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते. धागा ओवताना हातात सुई धरण्यापासून ते मणी ओवेपर्यंत संपूर्ण काम शिकविण्यासाठी शाळेचे दहा शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. राख्या बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांना ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागला. समाजामध्ये ही मुले कुठेही कमी पडता कामा नये, या हेतूने त्यांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. सणांचे महत्त्व, त्यामागचा हेतू याची माहिती विद्यार्थ्यांना या वेळी दिली जाते.