उरण-भाऊचा धक्का प्रवासी वाहतूक रुतली गाळात, बुधवारपासून सहा दिवस सेवा बंद, प्रवाशांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:49 IST2025-12-05T09:47:28+5:302025-12-05T09:49:09+5:30
E-ferry from gateway of india to uran: कोट्यवधींचा खर्च करूनही मोरा बंदरात गाळाची समस्या अद्यापही कायम राहिली आहे. ऐन दत्तजयंतीच्या यात्रेतच प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

उरण-भाऊचा धक्का प्रवासी वाहतूक रुतली गाळात, बुधवारपासून सहा दिवस सेवा बंद, प्रवाशांमध्ये संताप
उरण : समुद्राची ओहोटी, मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे ३ ते ८ डिसेंबरपर्यंत सलग सहा दिवस मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लॉन्च वाहतूक संध्याकाळनंतर बंद राहणार आहे. ऐन दत्तजयंतीच्या यात्रेतच प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
कोट्यवधींचा खर्च करूनही मोरा बंदरात गाळाची समस्या अद्यापही कायम राहिली आहे. मोरा बंदरात साचलेला गाळ व समुद्राच्या ओहोटीमुळे प्रवासी लॉन्चेस धक्क्यापर्यंत पोहोचतच नाहीत. यामुळे समुद्राच्या उधाणाच्या ओहोटीत महिन्यातील तीन-चार दिवस प्रवासी वाहतूक बंद करण्यात येते.
आताही बुधवारपासून (३) दुपारनंतर मोरा-भाऊचा धक्कादरम्यानची सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद केली आहे. तर बुधवारपासून सोमवारपर्यंत सलग सहा दिवस दुपारनंतर प्रवासी वाहतूक बंद केल्याची माहिती एमएमडीचे बंदर निरिक्षक सुशील साटेलकर यांनी दिली.
सफाईसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात
ओहोटी, गाळाच्या समस्येमुळे अनेक वर्षांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येत आहे. कोट्यवधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिली आहे.