'उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत आहे'; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:38 IST2022-07-12T20:38:44+5:302022-07-12T20:38:58+5:30

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.

Union Minister Narayan Rane has criticized Shiv Sena chief and former chief minister Uddhav Thackeray. | 'उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत आहे'; नारायण राणेंची टीका

'उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत आहे'; नारायण राणेंची टीका

नवी मुंबई- केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एका कार्यक्रमासाठी नारायण राणे आज नवी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशणा साधला. 

उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत आहे, असं सांगत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. ते आता कुणी राहिले नाही, असं नारायण राणे म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती देखील नारायण राणे यांनी यावेळी दिली. 

Web Title: Union Minister Narayan Rane has criticized Shiv Sena chief and former chief minister Uddhav Thackeray.