नवी मुंबई : जेसीबी व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दोन युवकांच्या मृत्यूची घटना ऐरोलीत घडली. यातील एक अल्पवयीन आहे. दोघेही दुचाकीवरून जात असताना चौकात समोरून येणाऱ्या जेसीबीला धडक लागल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर १४ येथील चौकात शुक्रवारी सकाळी १०:३० च्या सुमारास हा अपघात झाला. परिसरात राहणारा हर्षद सावर्डेकर (१८) व दिग्विजय दिंडे (१७) हे दोघे जण दुचाकीवरून चालले होते. चौकात वळण घेत असलेल्या जेसीबीला त्यांची धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. जेसीबीचालक हनुमंत शिंदे (२९) याच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच सहायक आयुक्त राहुल धस, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली.
पालकांना धोक्याचे संकेत
शहरात अल्पवयीन मुले किंवा चालक परवाना नसलेली नुकतेच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली मुले भरधाव दुचाकी पळवताना दिसतात. पालकांकडूनही त्यांच्या अशा कृतीचे समर्थन होत असते. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या अशा पालकांवरही कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
...तर वाचले असते प्राण
रस्त्यावर जेसीबी चालवत असताना समोरील लोडर (बकेट) वरती करणे आवश्यक होते. मात्र, जेसीबी चालकाने ते खालीच ठेवले होते. यामुळे दुचाकीची समोरून धडक बसली असता बकेटचा दात दिग्विजय दिंडे याच्या छातीत घुसून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षद हा दुचाकीवरून उडून काही अंतरावर पडल्याने मृत पावला. जेसीबीचे लोडर वर असते तर अपघाताची तीव्रता कमी होऊन प्राण वाचू शकले असते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Web Summary : Two young men, one a minor, died in Airoli after their motorcycle collided head-on with a JCB. The JCB driver has been arrested. Eyewitnesses claim raising the JCB's loader could have lessened the accident's severity and saved lives.
Web Summary : ऐरोली में एक बाइक के जेसीबी से टकराने से दो युवकों की मौत हो गई, जिनमें से एक नाबालिग था। जेसीबी चालक को गिरफ्तार कर लिया गया है। प्रत्यक्षदर्शियों का दावा है कि जेसीबी के लोडर को ऊपर उठाने से दुर्घटना की गंभीरता कम हो सकती थी और जान बचाई जा सकती थी।