जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 05:56 IST2020-01-24T05:56:40+5:302020-01-24T05:56:52+5:30
तळोजा एमआयडीसीमधील वलप गावाशेजारी असलेल्या खाणीमध्ये सहा वर्षांच्या जुळ्या भावंडांचा गुरुवारी बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली.

जुळ्या भावंडांचा बुडून मृत्यू
पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील वलप गावाशेजारी असलेल्या खाणीमध्ये सहा वर्षांच्या जुळ्या भावंडांचा गुरुवारी बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली.
लव आणि कुश गंगेश यादव अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वलप गावातील लोट्स प्रिप्रायमरी शाळेत शिकत होते. खेळताना दोघेही जण या ठिकाणी खोदलेल्या खाणीमध्ये उतरले.
पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा या खाणीत बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.