शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याच्या लक्षवेधीवरून महासभेत गोंधळ

By admin | Updated: September 10, 2015 00:01 IST

शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये

नवी मुंबई : शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर या विषयावर शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. नवी मुंबईमध्ये मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने थैमान घातले आहे. पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या मुलांनाही डेंग्यू झाला आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनास साथ नियंत्रणामध्ये आणण्यात अपयश आले असून लोकप्रतिनिधींसह शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले व राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी लक्षवेधी मांडली होती. परंतु महापौरांनी हा विषय गंभीर असून त्यावर सविस्तर चर्चा करता यावी यासाठी शुक्रवारी विशेष महासभा बोलावण्याचे आश्वासन दिले. परंतु लक्षवेधीवर तत्काळ चर्चा करण्यात यावी. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरियाचा प्रश्न गंभीर झाला आहे असे स्पष्टीकरण दिले. परंतु शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त करून महापौरांना घेराव घातला. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महापौरांच्या आसनासमोर जावून तुम्ही कामकाज सुरू करा, असे आवाहन केले. जवळपास एक तास गोंधळ सुरू होता. सत्ताधारी व विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू असल्यामुळे अखेर महापौरांनी कामकाज सुरू केले. गोंधळामध्येच चार विषय मंजूर करून जेवणाची सुटी घोषित केली यामुळे गोंधळ थांबला. आता या विषयावर शुक्रवारी विशेष सभा होणार असून त्यामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ची दखल‘लोकमत’ने आरोग्याच्या प्रश्नावर सातत्याने लक्ष वेधले आहे. अनेक नगरसेवकांनी लोकमत सभागृहात आणला होता. शिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी लोकमतमधील बातम्यांचा उल्लेख करून आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली. प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी नकोमहापौरांनी विशेष महासभा घेण्याचे जाहीर केल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ व घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करणे थांबवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.