पनवेल महानगरपालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या
By वैभव गायकर | Updated: March 19, 2024 22:43 IST2024-03-19T22:40:57+5:302024-03-19T22:43:59+5:30
Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या दि.१९ रोजी करण्यात आल्या.आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पनवेल महानगरपालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या
पनवेल - पनवेल महानगरपालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या दि.19 रोजी करण्यात आल्या.आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना भारतीय निवडणूक आयोगाने शासनाला केल्या होत्या.त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु आहे.