शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोने शतक गाठले; बाजार समितीत शंभरीपार, राज्यभर तुटवडा, श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ११० रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 08:36 IST

Tomato price: रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - रोजच्या आहारामधील प्रमुख भाज्यांमध्ये समावेश असलेल्या टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला  विक्रमी दर मिळू लागला आहे. किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव ८० ते १०० पर्यंत पोहोचले आहेत. भाव वाढल्यामुळे शेतकरी खूश असून दुसरीकडे ग्राहकांना मात्र भाववाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

पाऊस सुरू झाल्यापासून राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव वाढू लागले आहेत. बाजारभाव वाढलेल्या वस्तूंमध्ये टोमॅटोचाही समावेश आहे. एक महिन्यात दर पाच पट वाढले आहेत. बुधवारी राज्यातील २४ बाजार समित्यांमध्ये ११७९ टन टोमॅटोची आवक झाली आहे. सर्वाधिक ५०४ टन आवक जुन्नर-नारायणगाव बाजार समितीमध्ये झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये २३१ टन आवक झाली आहे. राज्यात टोमॅटोला सर्वाधिक भाव श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. ३० ते ११० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री झाली आहे. सोलापूरमध्ये ९ ते ८० रुपये, औरंगाबादमध्ये ५० ते ७० रुपये भाव मिळाला आहे. 

राज्यातील टाेमॅटोची एकूण आवक(टन)    दिनांक    आवक    २३ जून    १५४२    २४ जून    १४८०    २५ जून    ५३८    २६ जून    ९०८    २७ जून    ६००    २८ जून    ११७९

पुढचे काही दिवस दर तेजीतचमुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटो ३५ ते ४५ रुपये किलो दराने विकला गेला आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. काही दिवस टोमॅटाेचे दर तेजीत राहतील, असा  व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

रोजच्या आहारात टोमॅटोचा वापरमुंबईकरांच्या आवडत्या पावभाजीसाठी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची गरज असते. याशिवाय हॉटेलसह घरांमध्येही सलॅड म्हणूनही टोमॅटोचा वापर केला जातो. विद्यार्थी व नोकरदारांच्या डब्यावरही टाेमॅटोच्या भाजीला पसंती दिली जाते.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई