शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या बहाण्याने जखमीला फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:45 IST

जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यालगत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात जखमी तरुणाचा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यालगत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात जखमी तरुणाचा उपचाराविना मृत्यू झाला असून अपघाताच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी ओला चालकाच्या साथीदाराला अटक केली आहे.सीबीडी सेक्टर १५ येथील चौकात कार व मोटारसायकल यांच्यात धडक होवून अपघात झाल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री घडली होती. भरधाव ओला चालकाला समोरील दुचाकीचा अंदाज न आल्याने कारची धडक लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाच्या तावडीतून वाचण्यासाठी ओला चालकाने जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमधून नेले. दरम्यान, काही तासातच जखमीच्या पत्नीला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी संपूर्ण परिसरात, रुग्णालयात शोधाशोध करूनही जखमीची माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह सापडला. सचिन सुर्वे (३२) असे त्याचे नाव असल्याचे समजले. त्याच्या पत्नीने देखील मृतदेह ओळखल्यानंतर सीबीडी पोलीस ठाण्यात ओला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजू पठाण, चंद्रहार गोडसे यांचे पथक सलग दोन दिवस तपास सुरू केला. अखेर ओला चालकाला कार लपवण्यात तसेच पळण्यासाठी मदत केल्याप्रकरणी रईस खान याला अटक करण्यात आली. मात्र चालक अद्याप फरार आहे. त्याच्या कृत्यामुळे जखमीचा उपचाराविना मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सचिन सुर्वेला उपचारासाठी वेळीच रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते. मात्र ओला चालकाने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी सुर्वेला नेरुळमधील एकांताच्या ठिकाणी रस्त्यालगत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई कामगारांना त्याठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुर्वेला धडक देणारी ओला कार रईस खान याचीच असून, अपघातावेळी तोच कार चालवत होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघातावेळी घटनास्थळी त्याला पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी देखील पोलिसांच्या संपर्कात आला आहे. अपघातानंतर त्याने नागरिकांच्या समक्ष सुर्वेला एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तत्काळ आयसीयूमध्ये घेवून जाण्यास सुचवल्याने त्याने सुर्वेला वाशीला घेवून जाण्याऐवजी रस्त्यालगत फेकून दिले.