शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात आंदोलन

By admin | Updated: July 22, 2015 02:27 IST

पनवेलमधील कोळवडी येथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सोयी-सुविधांअभावी काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे

पनवेल : पनवेलमधील कोळवडी येथे भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सोयी-सुविधांअभावी काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना सोडावे लागले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी खांदा वसाहतीमधील शासकीय वसतिगृहात १५ दिवस तात्पुरता मुक्काम ठोकला होता. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. याप्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा हे विधानसभेत दिशाभूल करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. आमदार मनोहर भोईर यांनी कोळवडी येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करीत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकासमंत्र्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. ही माहिती खोटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. गेल्या तीन महिन्यांपासून खांदा वसाहतीमधील शासकीय वसतिगृहात हे विद्यार्थी थांबले आहेत. जव्हार, वाडा, कर्जत, रायगड, रोहा, नेरळसह विविध भागांतील विद्यार्थी याठिकाणी राहतात. नवीन प्रवेशप्रक्रि या सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना अडचणीमुळे प्रवेश घेता आलेले नाही. राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गावामधून ये-जा करावी लागत आहे. हे खर्चिक देखील असल्यामुळे शिक्षणात अडचणी येत आहेत. वेळेवर प्रवेश न घेतल्याने महाविद्यालय नोटिसा पाठवत आहेत. त्यामुळे २०० विद्यार्थ्यांनी खांदा कॉलनीत निदर्शने केली. (प्रतिनिधी)