नवी मुंबईत भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 10:28 IST2019-07-13T10:27:46+5:302019-07-13T10:28:44+5:30
चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या
नवी मुंबई - तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या झाली आहे. गोदामतील भंगाराच्या चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या परिसरात अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये हा प्रकार घडला. डोक्यात जड वस्तू घालून तसंच चाकूचे वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.