अवैध शस्त्रसाठ्यासह तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:11 IST2018-11-29T23:11:02+5:302018-11-29T23:11:10+5:30

तीन शस्त्रे जप्त : दहा जिवंत काडतुसांसह दोन वाहने ताब्यात

Three persons held with illegal weapon | अवैध शस्त्रसाठ्यासह तिघे अटकेत

अवैध शस्त्रसाठ्यासह तिघे अटकेत

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी शस्त्र विक्रीसाठी आलेल्या टोळीमधील तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कार्बाईन, २ पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, रिक्षा व कार ताब्यात घेतली आहे.


अटक केलेल्या आरोपींमध्ये वसीउल्लाह चौधरी, मतीउल्लाक वहाब व माणिकप्रसाद पटेल यांचा समावेश आहे. हे आरोपी घणसोलीमध्ये शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती रबाळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घणसोली सेक्टर ११ मधील अटलांटा सोसायटीजवळ बुधवारी रात्री १ वाजता सापळा रचला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या तीनही आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे १ कार्बाईन, २ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे आढळून आली. या सर्वांना अवैध शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील शस्त्रांसह वाहनेही जप्त केली आहेत.


पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त सुरेशकुमार मेकला, परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी डोंबिवली व भांडुपमधील रहिवासी आहेत. त्यांनी हा शस्त्रसाठा कोठून आणला व कोणाला विक्री केला जाणार होता याची माहिती घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Three persons held with illegal weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.