शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एका भूखंडासाठी तीन वारस दाखले

By admin | Updated: December 7, 2015 01:24 IST

नावडे येथे एकाच भूखंडाकरिता एका घरातील दोन व आणखी एक व्यक्ती असे तीन वारस दाखले तयार करण्यात आले आहेत.

पनवेल : नावडे येथे एकाच भूखंडाकरिता एका घरातील दोन व आणखी एक व्यक्ती असे तीन वारस दाखले तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका वारस कोण याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. खारघर येथील शरद सावंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. सत्यता पडताळणीकरिता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नावडे येथील सर्व्हे क्र मांक २४६/१६ या वर्णनाची जमीन सिडकोने संपादित केली होती. त्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेंतर्गत नावडे येथे सेक्टर-५४ येथे ७७ क्र मांकाचा भूखंड मंजूर करण्यात आला आहे. शंकर बाळू म्हात्रे यांचे वारस म्हादू नामा म्हात्रे व बामा नामा म्हात्रे यांना सिडकोने १६00 चौमी भूखंडाची पात्रता असलेले पत्र दिले. त्यानुसार महादू नामा म्हात्रे यांनी सिडको कार्यालयाकडे ९0 हजार रूपये सिडकोला अदा सुध्दा केले. त्यानंतर वारसाबाबत पडताळणी करण्यात आली असता ६७/९८, ८0२/२00८, १५५/९४ हे तीन वारसा दाखल तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या तीनही दाखल्यामध्ये नावडे येथील २४६/१६ सर्व्हे क्र माकांचा उल्लेख आहे. रोडपाली येथील शंकर बगळ्या म्हात्रे यांच्या वारसांनी सुध्दा या भूखंडावर वारसा दाखला तयार करून हक्क सांगितले आहे. त्यांनी वारसा दाखल्यावर रोडपालीतील सर्व्हेबरोबरच नावडे येथील सर्व्हे नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे.त्यामुळे एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला असून नेमका खरा वारस कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शंकर बाळू म्हात्रे यांच्या वारसांबरोबर हा भूखंड खरेदी करण्याकरिता आपण व्यवहार केला असल्याचे शरद सावंत यांनी सांगितले. मात्र भूखंड क्र मांक ७७चे शंकर बाळू म्हात्रे यांचे दोन वारस दाखल्याबरोबर शंकर बगळ्या म्हात्रे यांचा सुध्दा एक वारस दाखला आपल्या हाती लागला त्यावरून हे प्रकरण उघडकीस आले असल्याचे सावंत म्हणाले. तफावत दिसून आल्याने पनवेल कोर्टातून देण्यात आलेल्या या दाखल्यापैकी खरा वारस दाखला कोणता व वारसदार कोण हे शोधण्याकरिता सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.