पनवेलमध्ये गुन्हे शाखेकडून देशी बनावटीची तीन पिस्तूल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:32 AM2019-10-21T00:32:47+5:302019-10-21T00:33:13+5:30

अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Three fake handguns seized from crime branch in Panvel | पनवेलमध्ये गुन्हे शाखेकडून देशी बनावटीची तीन पिस्तूल जप्त

पनवेलमध्ये गुन्हे शाखेकडून देशी बनावटीची तीन पिस्तूल जप्त

googlenewsNext

नवी मुंबई : अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनाटीची तीन पिस्तूल व सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्र विक्रीसाठी ते आले असता सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पनवेलमधील पळस्पे येथे काही जण अग्निशस्त्र खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे सहायक उपनिरीक्षक संजय पवार यांना मिळाली होती. यानुसार उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी पथक तयार केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक नीलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, राणी काळे, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार शशिकांत शेंडगे, विष्णू पवार, सतीश चव्हाण आदीचा समावेश होता.

या पथकाने शनिवारी गोवा-पनवेल मार्गावर पळस्पे येथे सापळा रचला होता. या वेळी त्या ठिकाणी तिघे जण आले असता, त्यांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. यामुळे त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन पिस्तूल व सहा काडतुसे आढळून आली. यानुसार त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील साबळे (४५), समीर खान (२७) व रितेश नाईक (३०) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही सराईत गुन्हेगार असून, साबळे याच्यावर ११ गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. तर खान याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह खंडणी उकळणे व अमली पदार्थ विक्री असे चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे आढळून आलेले शस्त्र विक्रीसाठी त्या ठिकाणी ते आले होते, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Three fake handguns seized from crime branch in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.