खारघर मध्ये तिघांना जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 22:53 IST2018-06-24T22:53:31+5:302018-06-24T22:53:40+5:30
खारघर मधील तळोजा कारागृह समोर असलेल्या तलावात 3 जण बुडून मृत्यू पावल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली

खारघर मध्ये तिघांना जलसमाधी
पनवेल - खारघर मधील तळोजा कारागृह समोर असलेल्या तलावात 3 जण बुडून मृत्यू पावल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली,त्यातील एकाचा शोध लागला असून उर्वरित दोघांचा शोध खारघर अग्निशमन दलाचे जवान करीत आहे.हे तिघेही तळोजा वसाहती मधील रहिवासी आहे.
बुडून मृत पावलेल्या तरुणांची नावे फैयान खान (वय 19) रियान खान (वय 19) आणि अमित सिद्धीकी (वय 36 ) असे आहेत . सुट्टीचा दिवस असल्याने या तिघांनी खारघर शहरात सहलीचा बेत आखला होता . पांडवकडा धबधब्यावर बंदी असल्याने अनेक जण शहरातील लहाण मोठ्या खड्यात तसेच साचलेल्या पाण्यात जाण्याचा बेत आखत असतात . तिघेही तळोजा कारागृहासमोरील तलावात पोहत असताना खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचा दुर्दैवी अंत झाला . घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .