नेरुळमध्ये अडीच लाख रुपयांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:30 IST2019-05-29T23:30:26+5:302019-05-29T23:30:41+5:30

नेरुळ सेक्टर २० मध्ये मंगळवारी घरफोडीची घटना घडली आहे.

Theft of 2.5 lakh rupees in Nerul | नेरुळमध्ये अडीच लाख रुपयांची चोरी

नेरुळमध्ये अडीच लाख रुपयांची चोरी

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २० मध्ये मंगळवारी घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी मधाचा पोळा काढण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून आतमधील अडीच लाख रुपयांचे दागिने पळविले आहेत. येथील समर्थकृपा इमारतीमध्ये मंगळवारी तीन तरुण इमारतीमधील मधाचा पोळा काढण्याच्या बहाण्याने आले. २० ते २२ वर्षे वयाचे दोन व १५ वर्षांच्या एकाचा समावेश आहे. या तिघांनी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये चोरी करून पलायन केले आहे.

कपाटामधील १ लाख रुपये किमतीच्या पाटल्या, ७० हजाररुपये किमतीचा गंठन, ४५ हजार रुपये किमतीचे लॉकेट, १२ हजार ५०० रुपये किमतीची अंगठी, १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व १२ हजार रुपये किमतीचे झुमके चोरून नेले आहेत. घरातील सदस्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी तक्रार दिली आहे. पोलिसांनी तीन तरुणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of 2.5 lakh rupees in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.