निलंबित तहसीलदाराकडे तब्बल २.५ कोटींचे घबाड; उत्पन्नापेक्षा आढळली ९८ टक्के जास्त संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:40 AM2024-03-09T06:40:06+5:302024-03-09T06:42:30+5:30

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती. 

The suspended Tehsildar has a debt of 2.5 crores; Wealth found 98 percent higher than income | निलंबित तहसीलदाराकडे तब्बल २.५ कोटींचे घबाड; उत्पन्नापेक्षा आढळली ९८ टक्के जास्त संपत्ती

निलंबित तहसीलदाराकडे तब्बल २.५ कोटींचे घबाड; उत्पन्नापेक्षा आढळली ९८ टक्के जास्त संपत्ती

नवी मुंबई : अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या ९८ टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे. लाच मागितल्याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली असून, बहुतांश संपत्ती त्यांच्या पतीच्या नावे केली होती. त्यांना ७ दिवसांची कोठडी दिली आहे. 

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दळवी यांच्यावर लाच घेताना कारवाई केली होती. तक्रारदार यांच्याकडे त्यांनी ५ लाखांची लाच मागून त्यापैकी २ लाख रुपये घेतले होते. त्यांच्या घराच्या झडतीत १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने व काही मालमत्तांची माहिती हाती लागली होती. 

५ घरे, १ भूखंड आणि एक गाळा 
-मालमत्तेच्या अधिक चौकशीत मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर आली आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच ५ घरे, १ भूखंड व १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे. ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या (वय ५५) नावे केलेली आहे. 

-कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता; मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता. 

-यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
 
Web Title: The suspended Tehsildar has a debt of 2.5 crores; Wealth found 98 percent higher than income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.