शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

एक लाख रोजगार देणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कचे पुढचे पाऊल; पर्यावरण दाखल्यासाठी केला अर्ज

By नारायण जाधव | Updated: February 27, 2023 20:17 IST

मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत आकार घेत आहे.

नवी मुंबई : मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत आकार घेत आहे. २१.३ एकर क्षेत्रावर हे पार्क पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येत आहे. या पार्कच्या उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पर्यावरण विभागच्या ना हरकत दाखल्यासाठी इंडिया ज्वेलरी पार्कचे उपसंचालक जितेंद्र घोलप यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीकडे अर्ज केला आहे.

या पार्कसाठीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठीचा एमआयडीसीसोबतचा करार जानेवारी २०२२ मध्ये झाला होता. त्यानंतर आता वर्षभरानंतर इंडिया ज्वेलरी पार्क, या संघटनेने परिवेश समितीकडे पर्यावरण दाखला मागितला आहे. या प्रकल्पामध्ये परिसरातील कामगारांसाठी कमी किमतीच्या निवासी सुविधा विकसित करून त्यांना प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. यामुळे कुशल कारागीर निर्माण होण्यास मदत होणार आहे.

आभूषणे बनविणारी १००० युनिटमहापे एमआयडीसीतील इलेक्ट्राॅनिक झोनमधील भूखंड क्रमांक ईएल २३७ वर पहिल्या टप्प्यात २१.३ एकर भूखंडावर हे पार्क आकार घेणार आहे. त्या ठिकाणी २० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आणि सुमारे एक लाख लोकांना रोजगार निर्माण होईल, असे सांगण्यात येत आहे. जगातील अत्यंत आधुनिक मशिनरींनी युक्त असे हे पार्क राहणार असून त्या ठिकाणी रत्ने आणि आभूषणे बनविणारी १००० युनिट पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

असे असेल पार्कए ब्लॉक - १४ माळ्यांच्या ९ इमारती राहणार असून त्या एकमेकांना जोडलेल्या राहणार आहेत. या इमारती मोठ्या कारखान्यांसाठी असतील. या ठिकाणी २६७२ ते ५२७३ चौरस फुटांचे गाळे राहणार आहेत. अशा प्रकारे येथे २३ लाख चौरस फूट कार्पेट एरिया असेल, असे संघटनेने आपल्या ब्रोशरमध्ये म्हटले आहे. 

बी ब्लॉक - ही इमारत छोट्या कारखान्यांसाठी राहणार असून ती नऊ माळ्यांची असणार आहे. येथे ४१३ ते ६२१ चौरस फुटांचे गाळे असतील. येथे तीन लाख चौरस फुटांच्या वर जागा मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले आहे.

 दरवर्षी ४० टन सोन्याची बचतजानेवारी २०२२ मध्ये हा भूखंड ताब्यात घेतला त्यावेळी जीजेईपीसीचे (जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) उपाध्यक्ष विपुल शाह यांनी सांगितले होते की, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांअभावी सोन्याच्या नुकसानीचे जे प्रमाण १० आहे, ते या पार्कच्या उभारणीनंतर ३ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. सोन्याची धूळ ही अत्याधुनिक सक्शन आणि ड्रेनेज सिस्टीमद्वारे सहज मिळवता येणार आहे. यामुळे दरवर्षी ४० टन सोन्याची बचत होऊ शकते.” यावरून नवी मुंबईतील हे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना येऊ शकते.

 

 

 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईjewelleryदागिनेEmployeeकर्मचारी