अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ! ठाणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 08:07 AM2021-09-12T08:07:17+5:302021-09-12T08:08:15+5:30

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिचा ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

thane court rejects bail plea of actress Ketki Chitale pdc | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ! ठाणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ! ठाणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिचा ठाणेन्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. मार्च २०२० मध्ये तिने सोशल मीडियावर अनुसूचित जाती व जमातीविषयी टीका केली होती. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तिने जामिनाकरिता ठाणेन्यायालयात अर्ज केला होता.

घणसोली येथील वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केतकी व सूरज शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. केतकी हिने सोशल मीडियावर अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींबाबत अपशब्द वापरले होते. तर तिच्या पोस्टला अनुसरून सूरजने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे या पोस्टबद्दल माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व वकील जगताप यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली होती.
 

Web Title: thane court rejects bail plea of actress Ketki Chitale pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app