शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

दहशतवादी हल्ल्याचा शहरवासीयांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:30 AM

काश्मीर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी शिवसेना व मनसेच्या वतीने वाशीत पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली.

नवी मुंबई : काश्मीर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी शिवसेना व मनसेच्या वतीने वाशीत पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली. तसेच शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.जम्मू येथून श्रीनगरला जात असलेल्या भारतीय सैन्याच्या ताफ्यात आरडीएक्सने भरलेली गाडी घुसून स्फोट घडवल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुलवामा येथे घडला. दहशतवाद्यांकडून झालेल्या या भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले असून, अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा आत्मघाती स्फोट घडवून आणणारा काश्मिरी तरुण असल्याने त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यानुसार जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, त्यामुळे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तान विरोधात निदर्शने करण्यात आली. वाशीतील शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. या वेळी शिवसेना मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, अतुल कुलकर्णी, विजय माने, नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, हरिश्चंद्र भोईर, समीर बागवान आदी उपस्थित होते. त्यांनी पाकिस्तान विरोधात निदर्शने करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घातला. तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला, तर संध्याकाळी मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या निदर्शनावेळी शहराध्यक्ष गजानन काळे, संदीप गलुगडे, नीलेश बानखिले, विलास घोणे, नितीन खानविलकर आदी उपस्थित होते. त्यांनीही पाकिस्तानचा झेंडा व पुतळा जाळून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.कामोठे, कळंबोलीत नोंदवला निषेधकामोठे, कळंबोलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. गुरुवारी रात्री कामोठे येथे सेक्टर ५ येथील मोकळ्या मैदानात शर्मेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली तरुण एकत्र आले. त्यांनी हातात मेणबत्या घेऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी रामदास लकडे, देवेंद्र गायकवाड, प्रदीप मोहिते, अमर पाटील यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.कळंबोली येथील बिमा नाक्यावर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.- पालिकेच्या स्थायी समिती सभेतही दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. या वेळी सभापती सुरेश कुलकर्णी, आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी शहिदांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष सभा एक दिवसासाठी तहकूब करण्यात आली.- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने एपीएमसी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांच्यासह इतर सर्वच संघटनांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहत सरकारने या हल्ल्याला सडेतोड प्रत्योत्तर देण्याची भावना व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई