पनवेलमध्ये टँकरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 11:04 IST2017-10-03T11:03:16+5:302017-10-03T11:04:16+5:30

पाण्याच्या टँकरनं सायकलस्वार शाळकरी मुलाला धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पनवेलमधील सुकापूर येथील ही घटना आहे.

Teenager students die on the spot in tanker | पनवेलमध्ये टँकरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

पनवेलमध्ये टँकरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

पनवेल : पाण्याच्या टँकरनं सायकलस्वार शाळकरी मुलाला धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुकापूर येथील ही  घटना आहे. अभिषेक राजकुमार चौहान असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषक चौहान हा  किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी होता. अभिषेक आकुर्ली येथे आपल्या आईवडिलासंह राहत होता.

अभिषेक चौहान हा नेहमीप्रमाणे सायकलवरुन सुकापूर येथील किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कूल येथे जात होता. सकाळी 7.15 ते 7.30 वाजण्याच्यादरम्या आकुर्ली विमल वाडी येथून अभिषेक जात असताना कामोठे येथील सुश्मिता वॉटर सप्लायर्सच्या टँकरने अभिषेकच्या सायकलला धडक दिली. या धडकेत अभिषेक गंभीर जखमी झाला. अपघातात अभिषेकच्या पोटाला व पायाला दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.  


 

Web Title: Teenager students die on the spot in tanker

टॅग्स :Accidentअपघात