बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:55 PM2020-09-18T23:55:09+5:302020-09-18T23:55:46+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Suspend if asked to bring medicine from outside, Guardian orders | बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

Next

रायगड : जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे आणण्यास सांगत आहेत. अशा डॉक्टरांना त्वरित निलंबित करा, असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा घेतला. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता संपली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टरांकडून खासगी औषधांच्या दुकानातून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. किमान तीन हजार रुपयांपर्यंतचा किंबहुना त्यापेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड संबंधित रुग्णाला सोसावा लागत आहे, परंतु सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा शिल्लक असताना रुग्णांना नाहक त्रास दिला जात असल्याने, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली.
खासगी औषध दुकानामधून औषधे आणण्याचा आग्रह धरणाºया संबंधित डॉक्टरांना तातडीने निलंबित करा, असे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.

तीन बेड सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन बेड सौम्य लक्षणे असणाºया रु ग्णांसाठी जिल्ह्यातील आॅक्सिजन आणि आयसीयू बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. वाढणारा आकडा लक्षात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान तीन बेड हे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाºयांसाठी आरक्षित करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा’
माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढील कालावधीत रुग्ण वाढण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकार, प्रशासनाची आहे. मात्र, कोणतेही दुखण अंगावर काढू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचार घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Suspend if asked to bring medicine from outside, Guardian orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.