शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

"पवारांच्या 'त्या' सभेवेळी कॅमेरामन म्हणाला होता, कॅमेरा दीड लाखांचा आहे, भिजला तर भरून द्यावा लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या सभेतील पवारांच्या 'त्या' पावसात भाषण करतानाच्या फोटोचा किस्सा सांगितला आहे. त्या नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. (Supriya Sule on satata rally)

नवी मुंबई : राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची साताऱ्यातील (Satara) भरपावसात झालेली सभा जबरदस्त गाजली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्या सभेतील पवारांच्या 'त्या' पावसात भाषण करतानाच्या फोटोचा किस्सा सांगितला आहे. त्या नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. (Supriya Sule says how cameraman take shooting of NCP leader sharad pawar in satara rally)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवारांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. त्यावेळी तेथे माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, ती रद्द होईल, या विचाराने सर्वच पत्रकार मंडळी निघून गेले होते. तेथे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीडिया सेलचाच व्यक्ती उपस्थित होता. त्याने शशिकांत शिंदे यांना फोन लावला आणि सभा होणार आहे की नाही, अशी विचारणा केली. यावर शशिकांत यांनी सभा होणार असल्याचे सांगितले. यावर पुन्हा तो म्हणाला, माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल. यानंतर शशिकांत यांनी त्या कॅमेरामनला कॅमेरा भरून देण्याचं आश्वासन दिलं आणि शुटिंग करायला सांगितली. यानंतर, त्या कॅमेरामनला देशातल्या टर्निंग पॉईंटचा फोटो मिळाला." एवढेच नाही, तर  नियतीच्या मनात काय असते ते कुणालाही माहिती नसते. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढलात तर त्याचा परिणाम चांगलाच होतो,” असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण नवी मुंबईत 1 हजार 1 टक्के सत्ता परिवर्तन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. यावेळी नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

....अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस