शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

पोलीसपुत्रांनी कुटुंबाचा भार उचलल्याने मिळणार आधार; १९ जणांना नियुक्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:45 PM

१९ जणांना नियुक्तीपत्र

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १९ शहिदांच्या परिवारातील सदस्यांना पोलीस दलात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. त्यात ५ महिलांचा समावेश असून, घरातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्या कुटुंबासाठी पुढे आल्या आहेत. त्यात उच्चशिक्षित पोलीसपुत्रांचाही समावेश आहे.

गतवर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पोलिसांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीत स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवत नागरिकांच्या सुरक्षेची भूमिका पोलीस निभावत होते, परंतु कर्तव्य बजावताना झालेल्या संसर्गामुळे नवी मुंबई पोलीस दलातील एक हजाराहून अधिक पोलीस व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी १० पोलिसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्य शासनाने त्यांना कोविड योद्ध्यांचा दर्जा दिला. मात्र, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती केल्यामुळे कधी न भरून निघणारी पोकळी या कुटुंबात झाली होती. अशातच शहिदांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर पोलीस दलात घेण्याचा निर्णयाने अनेक कटुंबांना आधार मिळाला आहे. 

त्यानुसार, वडील अथवा पतीच्या जागी पोलीस दलात नोकरी करण्यासाठी १९ वारसदार पुढे आले आहेत. त्यात शहीद हवालदार अविनाश दडेकर यांच्या पत्नी रूपाली दडेकर यांच्यासह ५ पोलीस कन्यांचा समावेश आहे. महिला पोलीस शिपाईपदावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याशिवाय १४ पोलीसपुत्र पोलीस शिपाईपदाच्या भरतीला तयार झाले आहेत. त्यांना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तिपत्र दिले जाणार आहे.

अनुकंपा तत्त्वावर होणाऱ्या या भरतीत मुलांमध्येही अनेक जण उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी विशाल रवींद्र पाटील हा बीएससी आयटीच्या अंतिम वर्षाला आहे. त्याचे सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी तो यापूर्वी सैन्य भरतीत उतरलाही होता. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आईला आधाराची गरज भासल्याने त्याने वडिलांच्या जागी पोलीस होण्याची तयारी दाखविली.

शिक्षण पूर्ण केल्यावर करायची होती नोकरी

नियुक्तिपत्र स्वीकारणाऱ्यांमध्ये सरस्वती राजेंद्र खोत हिचाही समावेश आहे. ती बीएससीच्या अंतिम वर्षाला असून, शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते, परंतु कोरोनामुळे वडिलांच्या निधनानंतर आई व लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आली आहे. त्यानुसार, पोलीस होऊन कुटुंबाचा आधार बनण्याचा निर्णय तिने घेतला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस