बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या
By पंकज पाटील | Updated: April 2, 2023 18:17 IST2023-04-02T18:17:03+5:302023-04-02T18:17:29+5:30
बदलापुरात एका हार्डवेअर दुकानदाराने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या
बदलापूर : बदलापुरात एका हार्डवेअर दुकानदाराने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. छोगाराम चौधरी (४३) असे या दुकानदाराचे नाव आहे.
बदलापूर पश्चिमेकडील बेलवली भागात असलेल्या भारत हार्डवेअर या दुकानात रविवारी (ता.२) सकाळी ११.२० वा च्या सुमारास हा प्रकार घडला. चौधरी यांनी त्यांच्या भारत हार्ड वेअर या दुकानातील सीलिंग फॅनच्या हुकाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.चौधरी यांनी आत्महत्या का केली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, बदलापूर पश्चिम पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.