राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 16:01 IST2021-02-19T16:00:52+5:302021-02-19T16:01:39+5:30
भोलानाथ ठाकूर (५२) हे नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक एक मधून २००० साली निवडून आले होते. त्यानंतर गतवर्षी त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या
नवी मुंबई : महापालिकेचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.
भोलानाथ ठाकूर (५२) हे नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक एक मधून २००० साली निवडून आले होते. त्यानंतर गतवर्षी त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. शुक्रवारी दुपारी त्यांच्या दिघा येथील राहत्या घरात आत्महत्या केली. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते अधिक तपास करत आहेत. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे राजकीय