भटक्या श्वानावर वृद्धाकडून अत्याचार; एक महिन्यांनी झाला उलगडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 28, 2023 03:38 PM2023-10-28T15:38:41+5:302023-10-28T15:38:46+5:30
एक वृद्ध व्यक्ती भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करताना दिसून येत होती.
नवी मुंबई : भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कोपर खैरणे सेक्टर १९ येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ काही तरुणांच्या हाती लागला होता. त्याद्वारे तरुणांनी एक महिना परिसरात पाळत ठेवून त्या वृद्धाचा शोध घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोपर खैरणेत राहणाऱ्या सुशील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. एक महिन्यापूर्वी त्यांच्या हाती एक व्हिडीओ लागला होता. त्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती भटक्या मादी श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करताना दिसून येत होती. या व्हिडिओद्वारे सुशील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता सदरची घटना सेक्टर १९ मधील साई अर्पण सोसायटीत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारासची असल्याचे समोर आले.
त्याद्वारे तरुणांनी मागील एक महिन्यापासून व्हिडीओ मधील व्यक्तीच्या शोधासाठी परिसरात पाळत ठेवली होती. अखेर गुरुवारी रात्री त्यांना व्हडिओ मधील व्यक्ती नजरेस पडली. यामुळे त्यास पोलिस ठाण्यात नेले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानुसार शनिवारी पहाटे त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मानू कदम (५५) असे त्याचे नाव असून तो मजूर आहे. परिसरातील मंदिरालगत तो रहायला आहे. रात्रीच्या वेळी साई अर्पण सोसायटीत त्याने प्रवेश करून भटक्या श्वानाला सोबत नेवून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता.