विचित्र अपघात, डम्परची दिशादर्शक फलकाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:42 IST2019-06-15T01:41:50+5:302019-06-15T01:42:32+5:30
खांदा येथील उड्डाणपुलाजवळ एका डम्परने दिशा दर्शक फलकाला धडक दिली आहे.

विचित्र अपघात, डम्परची दिशादर्शक फलकाला धडक
पनवेल : खांदा येथील उड्डाणपुलाजवळ एका डम्परने दिशा दर्शक फलकाला धडक दिली आहे. एम एच ४३ बीपी २८३२ या क्रमांकाचा डम्पर कळंबोलीकडून पनवेलच्या दिशेने चालला होता. तो खांदा वसाहत येथील उड्डाणपुलाजवळ आला असता त्याने येथील दिशादर्शक फलकाला सायंकाळी ७.३0 च्या सुमारास जोरात धडक दिली. यात दिशादर्शक फलकाचे नुकसान झाले असून डम्पर रस्त्यामध्ये उभा झाला होता. या विचित्र अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये चालक जखमी झाला आहे.