शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी चळवळीतील गुंडशाही थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:36 IST

कामगार नेत्यांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांचे कारवाईचे आश्वासन; अण्णासाहेब पाटील यांच्या ८७व्या जयंतीनिमत्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : माथाडी चळवळीमध्ये गुंडांचा शिरकाव झाला आहे. संघटनांचे पदाधिकारीच ठेकेदारी करू लागले आहेत. ठेकेदारी व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांना नावे देऊनही चळवळ बदनाम करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. आवाज उठविल्यामुळे गुंडांकडून माझाच घातपात केला जाण्याची शक्यता असली, तरीही आम्ही त्यांना घाबरत नाही, असे मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ८७व्या जयंतीनिमत्त माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांवर उपस्थितांचे लक्ष वेधले.

एका वखारीत कामगारांची नोंदणी करायची व इतर ठिकाणी नोंदणी न करता स्वत:च ठेकेदार बनायचे, असे उद्योग सुरू आहेत. माथाडी बोर्डाच्या बैठकांना काही गुंड उपस्थित असल्याचेही निदर्शनास आले आहे. या गुुंडांच्या विरोधात नावासह पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु संबंधितांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. चळवळीमधील गुंडगिरी व ठेकेदारी संपली पाहिजे. गुंडांपासून कामगारांचे रक्षण करण्याची गरज आहे. ठेकेदारी प्रवृत्तीच्या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. ठेकेदारी संपुष्टात आणली पाहिजे. या गुंडशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उठवित असताना, माझाच कार्यक्रम वाजण्याची शक्यता असल्याचे मतही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही माथाडी चळवळ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.माथाडी संघटनेचे नेते शशिकांत शिंदे यांनीही मेळाव्यात चळवळीसमोरील आव्हानांवर लक्ष वेधले. एपीएमसीचे व माथाडी चळवळीचे अस्तित्व टिकले पाहिजे. केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे भांडवलशाही वाढण्याची भीती आहे. नवीन कायद्याच्या आडून चोरीचा व्यापार करणाऱ्यांवर आळा घालण्याची गरज आहे. माथाडी बोर्डामधील काही अधिकारी मुजोर झाले आहेत. कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. येणाºया काळात माथाडी एकीने चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गुलाबराव जगताप यांनीही माथाडी चळवळीमध्ये चुकीच्या प्रवृत्तीचा शिरकाव झाला असल्याकडे लक्ष वेधले.

चुकीचे काम करणाºयांमुळे कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. मेळाव्यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड, माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अध्यक्ष अशोक डक, धनंजय वाडकर,चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.रुग्णालयासाठीही सहकार्य हवेमाथाडी कामगारांसाठी कोपरखैरणेमध्ये स्वतंत्र रुग्णालय आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवरही येथे उपचार केले जात असून, आतापर्यंत ५००पेक्षा जास्त रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यामुळे कामगारांची लेव्ही उपलब्ध झालेली नाही. शासनाने रुग्णालयासाठी दहा कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली.

‘माथाडी भूषण’ पुरस्कारांचे वितरणयावेळी ‘माथाडी भूषण’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तानाजी चिकणे, लक्ष्मण कोंडीबा कदम, बाळू महादेव गाढवे, महादेव बाबा काळे, दिलीप काशिनाथ चोरमले, विठोबा बाबुराव जाधव, राजाराम बबन हसबे, अशोक सोपान बागल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.