शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यापार वाचविण्यासाठी धडपड सुरू

By admin | Updated: May 29, 2017 06:44 IST

बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या अवैध व्यापाराविरोधात लोकमतने आवाज उठविताच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या अवैध व्यापाराविरोधात लोकमतने आवाज उठविताच खळबळ उडाली आहे. अवैध व्यापाऱ्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे. शनिवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनाही विरोध केल्याचे निदर्शनास आले आहे. कांदा - बटाट्याचा व्यापार करण्यासाठी एपीएमसीने स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. परंतु काही व्यापाऱ्यांनी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित व जुन्या मार्केटच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेवर अवैध व्यापार सुरू केला आहे. रोडवरच कांदा-बटाटा व इतर वस्तू खाली करून त्यांची विक्री केली जात आहे. रोज रोडवरील व्यापारातून ५० लाखपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. पदपथ व रोडवर माल उतरविल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही वाहतूक पोलीस संबंधितांवर काहीही कारवाई करत नाहीत. तुर्भे विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकानेही या व्यापाराला अभय दिले आहे. रोज रोड व पदपथ अडविणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर काहीही कारवाई केली जात नाही. बाजार समितीचे प्रशासनही कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी लोकमतकडे तक्रारी केल्या होत्या. याविषयी वृत्त प्रसिद्ध करताच एपीएमसीने कारवाईसाठी तगादा सुरू केला असून विक्रेत्यांनी अवैध व्यापाराला अभय मिळावे यासाठी वशिलेबाजी सुरू केली आहे. अवैध व्यापार सुरू करण्यासाठी यापूर्वी ज्यांनी पैसे घेतले व महापालिका, वाहतूक पोलिसांसह एपीएमसी प्रशासनाला कारवाई थांबविण्यासाठी मध्यस्थी केली त्यांच्याकडे जावून गाऱ्हाणी मांडली जात आहेत. याशिवाय प्रत्यक्षात अधिकाऱ्यांची भेट घेवून व्यवसाय वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे. एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी प्रवेशद्वारावर जावून कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यापाऱ्यांनी कारवाईस विरोध दर्शविला.