शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:50 PM

अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती.

नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

दहा हजारांच्या टप्प्यावर कर्णधार बदलला, पालिका आयुक्तांची बदली : नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवी मुंबई : शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. २२ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बदलीनाट्य घडविण्यात आले आहे. अभिजीत बांगर यांची २३ जूनला पहिल्यांदा नवी मुंबईत बदली केली, तेव्हा रुग्णसंख्या ५,०७२ होती. दुसऱ्यांदा नियुक्ती होईपर्यंत हा आकडा तब्बल ९,९१७ झाला असून, दहा हजारांच्या टप्प्यावरून शहर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. सुनियोजित शहरही कोरोनामुक्त करण्यात यश येत नसल्यामुळे, शासनाने २३ जूनला आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनधरणी करूनही बदली थांबविली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांकडेही बदली थांबविण्यासाठी स्थानिक पदाधिकाºयांनी आग्रह धरला होता. अखेर ४८ तासांमध्ये बदली रद्द करण्यात आली. पहिल्यांदा बदली नाट्य झाले, तेव्हा नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५,०७२ एवढी होती. कोरोनामुळे १७७ जणांचे बळी गेले होते. पुढील २२ दिवसांमध्ये या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. १४ जुलैला रुग्णसंख्या ९,९१७ झाली असून, मृतांचा आकडा ३१० झाला आहे. मधल्या २२ दिवसांमध्ये तब्बल ४,८४५ रुग्ण वाढले असून, १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बदली नाट्यामुळे प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम कोरोना नियंत्रणाच्या कामावर झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.कोरोनाचे आकडे दहा हजारांपर्यंत पोहोचले असताना, नवीन आयुक्त अभिजीत बांगर पदभार स्वीकारत आहेत. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान आयुक्तांसमोर असणार आहे. अनेक अधिकारी नवीन असल्यामुळे त्यांना नवी मुंबईमधील परिस्थितीची पूर्णत: माहितीच नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सर्वसाधारण रुग्णालय बंद असल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे. लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई होत नाही. नियम तोडणाºयांचा फटका नियम पाळणाºया नागरिकांना बसू लागला आहे.कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली या चार नोडमधील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, आयुक्त ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय करणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.कोण आहेत अभिजीत बांगर ?नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये एम.ए.ची पदवी घेतली आहे. ते २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रायगडमधील माणगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरचे पहिले जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई