शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

इरशाळगडवाडीच्या विकासाला गती, सौरऊर्जेने उजळले गाव, रस्त्याला रेलिंग बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 1:51 AM

रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इरशाळगडवाडीच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. ‘लोकमत’ने येथील प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील गैरसोयी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. गावामधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सौरऊर्जेचे दिवे देण्यात आले असून, गावापर्यंतच्या पायवाटेला पाइप रेलिंग बसविण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रायगडपासून ते प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक गड-किल्ले आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये इरशाळगडचा समावेश होतो. गडावर कोणतेही पुरातन बांधकाम नसले तरी गडावरील शिखर सर करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्र्यटक गडाला भेट देतात. ठाकूरवाडीमध्ये गाडी ठेवून पायवाटेने इरशाळगडवाडी व तेथून गडावर जावे लागते. गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटही व्यवस्थित नाही. गावामध्ये अद्याप विजेची सोय नव्हती. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु अनेक घरातील दिवे बंद झाले होते. गावातील शाळाही बंद झाल्याने मुलांना आश्रमशाळेत जावे लागत आहेत. ‘लोकमत’ने १५ आक्टोबरला येथील समस्यांवर लक्ष वेधले होते. गावामध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. विजेचे खांब टाकून वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ‘लोकमत’ची बातमी टाकून या समस्येकडे लक्ष वेधले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेऊन येथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. चौक ग्रामपंचायतीने या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती गटविकास अधिकारी खालापूर यांना दिली आहे.ग्रुप ग्रामपंचायत चौक येथील इरशाळगडवाडी (इसाळवाडी) येथील रस्ता हा डोंगराळ भागातील असून तो वनखात्याच्या अखत्यारित येतो. यामुळे ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखड्यामध्ये वाडीपर्यंतच्या रस्त्याला पाइप रेलिंग करण्याचे काम हाती घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या मार्फत गेल्या १५ दिवसांपासून सर्व कुटुंबांना घरगुती सोलर दिवे बसविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.गावामधील ग्रामस्थ गणपत पारधी यांच्याशी संपर्क साधला असता गावामधील प्रत्येक घरामध्ये शासनाच्या एजन्सीच्या माध्यमातून सौरऊर्जेचे दिवे दिले असल्याचे सांगितले आहे.पर्यटनवाढीला संधीखालापूर तालुक्यामधील इरशाळगड परिसरामध्ये पर्यटनवृद्धीला संधी आहे. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक गडाला भेट देत असतात. गडावरून मोरबे धरणाचा निसर्गरम्य परिसर पाहवयास मिळतो. गडाचा सुळका देशभरातील ट्रेकर्सला आकर्षित करत असतो. या परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावले व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या अजून वाढेल, असा विश्वास पर्यटकही व्यक्त करत आहेत.ऐतिहासिक इरशाळगडवाडीमधील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’वर पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन आदिवासीपाड्यामधील प्रत्येक घरात सौरऊर्जेचे दिवे दिले असून रस्त्याला पाइप रेलिंग केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड