मुलाने गळा दाबून केली आईची हत्या; कोपरी गावातील प्रकार, आरोपीला अटक

By कमलाकर कांबळे | Updated: October 29, 2023 19:06 IST2023-10-29T19:06:39+5:302023-10-29T19:06:56+5:30

एकवीस वर्षीय आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. रूपचांद शेख असे या आरोपीचे नाव आहे.

Son kills mother, Incident in Kopri village, accused arrested | मुलाने गळा दाबून केली आईची हत्या; कोपरी गावातील प्रकार, आरोपीला अटक

मुलाने गळा दाबून केली आईची हत्या; कोपरी गावातील प्रकार, आरोपीला अटक

नवी मुंबई : पोटच्या मुलाने आईचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईतील कोपरी गावात घडली आहे. याप्रकरणी एकवीस वर्षीय आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. रूपचांद शेख असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरी गाव सेक्टर २६ येथील गावदेवी मंदिराच्या शेजारी असलेल्या सागर भोईर इमारतीत वास्तव्याला आरोपी रूपचंद शेख हा आपली आई सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (४६) हिच्या सोबत राहतो. रविवारी कामावर जाण्यावरून दोघांत भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपी रूपचंद शेख याने घरातील उपरण्याने सलमा हिचा गळा दाबून ठार मारले. याच भागातील शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारी आरोपीची बहीण जास्मीन राभरोस ताती (२३) हिला हा प्रकार समजताच तिने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एपीएमसी पाेलिसांना या घटनेची माहिती दिली.

परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस उपायुक्त यांच्यासह एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुधाकर ढाणे तसेच सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, अशोक डमाळे आदींनी या घटनेची खबर मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पहाटे ६:२१ वाजता याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रूपचांद शेख याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अशोक डमाळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Son kills mother, Incident in Kopri village, accused arrested