शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण शिवाजी चौकात

By admin | Published: December 22, 2016 06:46 AM2016-12-22T06:46:10+5:302016-12-22T06:46:10+5:30

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. शनिवार, २४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

Shivshammar's Bhumi Pujan direct demonstration in Shivaji Chowk | शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण शिवाजी चौकात

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण शिवाजी चौकात

Next

पनवेल : अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. शनिवार, २४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडणार असून, या भूमिपूजनासाठी गडकिल्ल्याची पवित्र माती, महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे पाणी भाजपा कार्यकर्त्यांच्या मार्फत शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी अर्पण करणार आहे.
या संपूर्ण कार्यक्र माचे प्रक्षेपण पनवेल येथील शिवाजी चौकात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. शिवाजी चौकात एका मोठ्या स्क्रीनवर भूमिपूजनाचे प्रक्षेपण पाहता येणार आहे. शिवाजी चौकात स्क्रीन बसवल्या जातील, अशी माहिती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Shivshammar's Bhumi Pujan direct demonstration in Shivaji Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.