शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:00 IST2019-01-24T00:59:57+5:302019-01-24T01:00:09+5:30

बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे.

Shivsena's free game for Thackeray movie | शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ

शिवसेनेच्या वतीने ठाकरे चित्रपटाचे मोफत खेळ

पनवेल : बहुचर्चित ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पनवेलमध्येही ठाकरे चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होत असून हा चित्रपट एकाच वेळी पाच स्क्रीनवर मोफत दाखिवण्यात येणार आहे. शहरातील ओरियन मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहात जवळपास एक हजार नागरिकांना ठाकरे चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
या वेळी संपूर्ण पनवेलध्ये भगवे वातावरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी दिली. या चित्रपटाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने पनवेल महानगरात दोन दिवस सहा रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला. १९ आणि २० जानेवारी या दोन दिवसांत पनवेल येथील शिवाजी चौक, कच्छी मोहल्ला, नवीन पनवेल डीएव्ही हायस्कूल, कामोठे पोलीस ठाण्यासमोर चौक, उत्सव चौक खारघर, रोडपालीत अंबिका स्वीट आणि कळंबोली वसाहतीत हिंदुस्थान बँकेसमोर विक्री केंद्र सुरू करण्यात आली होती.

Web Title: Shivsena's free game for Thackeray movie