“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:29 IST2022-10-02T06:27:19+5:302022-10-02T06:29:07+5:30

मला थेट धमकी देत शिंदे गटात सामील होण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे.

shiv sena former councillor claims to threat of join the eknath shinde group otherwise we will do encounter | “शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी?

“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करुन एन्काउंटर करु”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी?

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शिंदे गटात सामील व्हा; अन्यथा तडीपार करून एन्काउंटर करू, अशी धमकी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांनी शनिवारी केला. 

माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याच्या हलचाली सुरू आहेत. त्यामुळे मी  पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी मला थेट धमकी देत शिंदे गटात सामील होण्यास सांगितल्याचा आरोप मढवी यांनी केला.  

दरम्यान, मढवी यांच्यावर मागील काही काळात विविध स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात हद्दपारीचा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. या भीतीतून त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: shiv sena former councillor claims to threat of join the eknath shinde group otherwise we will do encounter