शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 23:12 IST2023-07-03T23:11:21+5:302023-07-03T23:12:30+5:30
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत
नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौरा आटोपून सोमवारी रात्री मुंबईत परत आले. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
शरद पवार यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत #SharadPawarpic.twitter.com/QkdvDAdLQi
— Lokmat (@lokmat) July 3, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी चे दर्शन घेतले. सातारामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधून रात्री मुंबईत परत आले. नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी वाशी येथे महामार्गावर स्वागत केले. नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष सलुजा सुतार, माजी नगरसेवक संदीप सुतार, नवी प्रभारी प्रशांत पाटील, सुरेश शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबत असा मजकूर लिहिलेले फलक झळकवले. यावेळेस महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.