Selfie Point Becomes Attraction Of Minors | सेल्फी पॉइंट बनला अबालवृद्धांचे आकर्षण
सेल्फी पॉइंट बनला अबालवृद्धांचे आकर्षण

नवी मुंबई : वाशीत बनवण्यात आलेला सेल्फी पॉइंट अवघ्या काहीच दिवसांत तरुणांचे आकर्षण ठरला आहे. ‘आय लव्ह नवी मुंबई’ अशा संदेशाची प्रतिकृती त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. पालिका मुख्यालयानंतर शहरात दुसरा सेल्फी पाइंट बनल्याने गाठीभेटीचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्धी मिळू लागली आहे.

शहराच्या वैशिष्ट्यात भर टाकण्याच्या उद्देशाने पालिकेकडून अनेक संकल्प राबवले जातात. त्यानुसार सीबीडी येथील पालिका मुख्यालयाबाहेर जमणाऱ्यांच्या उत्साहात भर टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता. यामुळे त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ प्रेक्षक म्हणून भेट देणाऱ्यांचीही संख्या वाढतच चालली आहे. अशाच प्रकारचा दुसरा सेल्फी पॉइंट वाशी सेक्टर ८ येथे बनवण्यात आला आहे. नगरसेविका दिव्या गायकवाड यांच्या विशेष संकल्पनेतून त्या ठिकाणी ‘आय लव्ह नवी मुंबई’ या संदेशाची प्रतिकृती करण्यात आली आहे. त्याशिवाय सभोवतालचा परिसर सुशोभित करून नागरिकांना फेरफटका मारण्याचीही सोय करण्यात आलेली आहे. हे ठिकाण अल्प कालावधीतच तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. सागर विहारकडे जाणाºया मार्गावरच ते असल्याने त्या ठिकाणावरून ये-जा करणाºयांच्या नजरेत बसत आहे. यामुळे त्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह होत आहे.

हल्ली आपल्या प्रत्येक छंदाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचा मोह हाती मोबाइल असलेल्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे वाशी परिसरातील हौशींकडून आवर्जून त्या ठिकाणी भेट देऊन फोटो काढले जात आहेत. यामुळे संपूर्ण शहरात हे सेल्फी पॉइंट चर्चेचा मुद्दा बनले आहेत.

Web Title: Selfie Point Becomes Attraction Of Minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.