शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीसह महिला-बालकल्याण समिती सदस्यांची निवड

By admin | Updated: November 15, 2014 22:55 IST

पालिकेच्या स्थायीसह वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शनिवारच्या महासभेत जाहीर करण्यात आली.

भाईंदर - पालिकेच्या स्थायीसह वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शनिवारच्या महासभेत जाहीर करण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेना युतीने बहुमताच्या जोरावर स्थायीखेरीज उर्वरित दोन समित्यांतील सदस्यांची संख्या 9 वरून 15 वर नेण्याचा मांडलेला ठराव मान्य झाल्याने अन्य 6 सदस्यांना समितीत काम करण्याची संधी मिळाली.
स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांची मुदत 31 ऑक्टोबरला संपली होती. त्यात भाजपाचे शरद पाटील, रोहिदास पाटील, मीरादेवी यादव, राष्ट्रवादीच्या अनिता पाटील व याच पक्षाकडून पुरस्कृत झालेले बहुजन विकास आघाडीचे राजू भोईर व अपक्ष मुन्ना सिंह, काँग्रेसचे शेख अश्रफ मोहम्मद इब्राहिम व शिवसेनेचे प्रशांत दळवी यांचा समावेश होता. त्यांच्या जागी भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी नगरसेवक प्रशांत केळुसकर, डॉ. नयना वसाणी व भाजपाला पाठिंबा दिलेल्या बहुजन विकास आघाडी (बविआ) चे मोहन जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी स्टिव्हन जॉन मेंडोन्सा, नरेश पाटील व पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह ऊर्फ मुन्ना, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांची नावे महापौर कॅटलिन परेरा यांनी जाहीर केली. तसेच वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बाल कल्याण समितीच्या पूर्वीच्या सदस्यांत वाढ करण्याचा ठराव भाजपाचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते आमदार नरेंद्र मेहता यांनी मांडला असता त्याला शिवसेनेच्या नीलम ढवण यांनी अनुमोदन दिले. या समित्यांतील सदस्य संख्या 9 वरून 15 वर नेण्यात आली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीत भाजपाचे मदन सिंह, दिनेश जैन, सुशीला शर्मा, डिम्पल मेहता व मीरादेवी, राष्ट्रवादीचे रवींद्र माळी, सुरेश खंडेलवाल, आसीफ शेख व वंदना चक्रे, काँग्रेसचे प्रमोद सामंत, रेखा विराणी व मनीषा पिसाळ, शिवसेनेचे प्रशांत दळवी व प्रवीण पाटील आणि बविआचे राजू भोईर यांची निवड  करण्यात आली. शिवाय, महिला व बालकल्याण समितीत भाजपाच्या वर्षा भानुशाली, मेघना रावल, सुजाता शिंदे, सीमा शाह व कल्पना म्हात्रे, राष्ट्रवादीच्या दक्षता ठाकूर, शिल्पा भावसार, मेहरुन्निसा सुंबड व सेण्ड्रा रॉड्रिक्स, काँग्रेसच्या मर्लिन डिसा, दीप्ती भट व शर्मिला बगाजी, शिवसेनेच्या शुभांगी कोटीयन व अनिता परमार आणि बविआच्या भावना भोईर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले.  (प्रतिनिधी)