शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेचे ‘रिक्षा अ‍ॅप’ बारगळले

By admin | Updated: July 8, 2017 05:48 IST

काही दिवसांपासून ठाण्यात काही विक्षिप्त रिक्षा चालकांकडून महिलांबरोबर गैरवर्तुणुकीचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आरटीओ

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : काही दिवसांपासून ठाण्यात काही विक्षिप्त रिक्षा चालकांकडून महिलांबरोबर गैरवर्तुणुकीचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून विविध उपाय केले जात आहेत. या प्रकारांना आळा बसावा म्हणून ठामपादेखील पुढे सरसावली होती. यात रिक्षाचालकांची नोंदणी अत्यावश्यक करून प्रवासी सुरक्षेसाठी ओला-उबेरप्रमाणे दूरध्वनीवरु न रिक्षा बोलविण्याचे अ‍ॅप सुरु करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. परंतु, रिक्षा संघटनांमधील काही हेकेखोर नेत्यांमुळे हे अ‍ॅप सुरु न झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच ओला अ‍ॅपने सुरु केलेल्या योजनेलाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शहरात आजघडीला ३५ हजाराहून अधिक रिक्षा आहेत. यामध्ये अनधिकृत रिक्षांची संख्याही तितकीच आहे. परंतु, गेल्या काही महिन्यात महिलांबाबत काही रिक्षाचालकांकडून झालेल्या प्रकारानंतर सगळेच रिक्षावाले पोलिसांच्या रडारवर आले आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही रेल्वेस्थानक परिसरासह विविध भागात रिक्षांसाठी काही जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली होती. त्यातही रस्त्याच्या कडेला तयार होणाऱ्या अनधिकृत रिक्षा स्टँडला पायबंद बसण्याबरोबरच प्रवाशांची सुरिक्षतता हा भाग त्यांमध्ये होता. विशेष म्हणजे यासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करु न देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. ठामपाकडून एवढा चांगला प्रस्ताव आल्यानंतर शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेणे अपक्षित होते. परंतु, याला प्रतिसाद न देता काही संघटनाच्या नेत्यांनी यावर विचार करु न पुढील निर्णय घेणार असल्याचे कळविले. त्यावर पुढे काहीच हालचाल न करणाऱ्या या नेत्यांचा हा हेकेखोरपणाच मुजोर रिक्षाचालक मस्तावल्याचे आता दिसत आहे.रिक्षा मिळत नाही, हव्या त्या ठिकाणी जायला रिक्षावाला नकार देतो अशा तक्र ारींनी त्रस्त ठाणेकरांच्या मदतीला आता प्रथमच ओला रिक्षा सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. पहिल्या १.५ किमीसाठी १८ रुपये इतका मूळ दर, त्यापुढील प्रतिकिमीसाठी १२ रुपये आणि १५ रुपये सुलभता शुल्क आकारून ओला आॅटोचे बुकींग ठाण्यातील नागरिकांना घरबसल्या करता येत आहे. या रिक्षांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मीटरनुसारच भाडे आकारले जात आहे. आपण बोलावलेली रिक्षा कोठे आहे, कोणत्या रस्त्याने जाते याचे लाईव्ह ट्रॅकींगदेखील मोबाइलवर पाहण्याची सोय अ‍ॅपमध्ये आहे. ग्राहकाने नोंदणी केलेल्या इतर पाच ग्राहकांनादेखील हे रिक्षा ट्रॅकींग पाहता येणार आहे. ग्राहकांना रिक्षाचे भाडे ओला इन अ‍ॅप वॉलेटद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशाची अडचण ग्राहकाना भासणार नाही. याबरोबर किती भाडे झाले त्याचा एसएमएस व ई मेलदेखील ग्राहकांना लगेच त्यांच्या मोबाईलवर येत आहे. मात्र, शहरातील सुमारे ३५ हजार रिक्षांपैकी आतापर्यंत एक हजार रिक्षांनी नोंदणी केली आहे. मुळात अशा अ‍ॅप्सवर नोंदणीसाठी रिक्षाचे कागदपत्रे तसेच संबधित चालकाची माहिती देणे आवश्यक असते. ठाण्यात अद्यापही बेकादेशीर रिक्षा मोठ्या प्रमाणात धावत असल्याने त्यांना कायम काही रिक्षा संघटनांचे पाठबळ मिळत असते. अशावेळी महापालिकेने सुचिवलेल्या योजनेवर अथवा ओला सारख्य अ‍ॅप्सवर नोंदणीसाठी पुढाकार घेतल्यास बेकायदेशीर रिक्षांना चाप बसणार असल्याने अशा योजनांना हरताळ फासण्यात काही संघटनांचे नेते गुंतलेले आहेत. या संदर्भात काही रिक्षा युनियन वाल्यांशी चर्चा झाली असता याबाबत केवळ चर्चा झाली परंतु पालिकेने त्यानंतर काहीच पुढाकार घेतला नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांची आणि त्यातही महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सीसीटिव्ही लावण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. परंतु, त्याचवेळी तंत्रज्ञानावर रिक्षांची नोंदणी झाल्यास एखाद्या रिक्षाचालकाने लबाडी केल्यास त्याला अथवा किमान त्याची नोंदणी झालेल्या रिक्षा शोधणे सोपे होणार आहे. मात्र, यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.-संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा