फी भरण्यासाठी शाळांचे पालकांना आवाहन, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:41 AM2021-03-30T00:41:40+5:302021-03-30T00:44:51+5:30

कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.

Schools appeal to parents to pay fees, an atmosphere of concern among parents | फी भरण्यासाठी शाळांचे पालकांना आवाहन, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

फी भरण्यासाठी शाळांचे पालकांना आवाहन, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

googlenewsNext

नवी मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांवर आर्थिक संकट आल्याने फीसाठी शाळांनी तगादा न लावण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. आता शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा सुरू होत असल्याने पालकांनी संपूर्ण वर्षाची शालेय फी भरण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु अनेक पालकांची आर्थिक स्थिती अद्यापही सुधारली नसल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. (Schools appeal to parents to pay fees, an atmosphere of concern among parents)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता.  या काळात शाळा, महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करण्यात आली नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन काळात अनेक पालकांचे रोजगार बंद झाले असून, व्यवसायदेखील ठप्प झाले होते. या काळात शाळा प्रशासनाने फीसाठी पालकांकडे तगादा न लावण्याचे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.  

आता शैक्षणिक वर्ष जवळपास पूर्ण झाले असून, शहरातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वार्षिक परीक्षादेखील झाल्या आहेत; तर काही शाळांच्या परीक्षा सुरू होणार असून, पालकांनी फी भरावी, यासाठी शाळांच्या माध्यमातून आवाहन केले जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Schools appeal to parents to pay fees, an atmosphere of concern among parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.