खलाशांची सुरक्षा वा:यावर?

By Admin | Updated: December 10, 2014 22:43 IST2014-12-10T22:43:54+5:302014-12-10T22:43:54+5:30

गोवा येथे तीस वर्षीय सुकर भिखू वागनोडा (रा. तलासरी) खलाशाच्या अपघाती मृत्यूने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

The safety of the commuters: on this? | खलाशांची सुरक्षा वा:यावर?

खलाशांची सुरक्षा वा:यावर?

बोर्डी : तलासरी तालुक्यातील आदिवासी खलाशाचा पाक कैदेत संशयास्पद मृत्यूची घटना ताजी असताना गोवा येथे तीस वर्षीय सुकर भिखू वागनोडा (रा. तलासरी) खलाशाच्या अपघाती मृत्यूने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आदिवासी खलाशांच्या सुरक्षेकरीता शासनाने ठोस उपाययोजन्याच्या मागणीने जोर धरला आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यात सागरी मासेमारी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. पालघर तालुक्यातील डहाणू व तलासरी हे मासेमारी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. पालघर जिलतील डहाणू व तलासरी हे मासेमारी व्यवसायाला अकुशल मजुरांचा (खलाशी) पुरवठा करणारे तालुके आहेत. स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने अल्पवेतन व जोखीम पत्कारून आदिवासी नागरीक वर्षातील आठ महिने कुटूंबापासून लांब राहतात. परराज्यातील मासेमारी व्यवसायीक दलालाच्या माध्यमातून आदिवासी खलाशांचा अक्षरश: सौदा करतात. एक रक्मी पैसे बळजबरीने देणो, आगाऊ पैसे देणो, मद्य, मोबाईल, टी.व्ही, रेडीओ, कपडे इ. चैनीच्या वस्तूंचे आमीष दाखवले जाते. वास्तविक पगारातून पैसे वजा केले जातात. स्थानिक दलाल या सौदय़ात हात धुरून घेतो. कोणत्याही कायदेशीर बाबींची पुर्तता न करता अल्पवेतन, नित्कृष्ट जेवण, सापत्न वागणुक देऊन दिवस-रात्र वेठबिगा:याप्रमाणो कामास जुंपले जाते. आरपण अथवा अपरिहार्य कारणास्तव पैसे परत करणा:यास धमकावले जाते. मात्र अज्ञान, असंघटीत खलाशी अन्याय सहन करण्यापलिकडे काहीच करत नाही.
खलाशाचा अपघाती मृत्यू अथवा बेपत्ता झाल्यास वारसदार मच्छीमार कल्याण निधी, अपघात विमा इ. लाभ मिळत नाही. गुजरात समुद्रात मासेमारी करताना मासेमारी बोटीने पाक हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी येथील हजारो खलाशांनी तरूंगवास भोगला आहे. काहीजण आजही खितपत पडले आहेत. सुटकेची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची वाताहत झाली आहे. 
दरम्यान शेतकरी आत्महत्या, दलित व महिला अत्याचार, समुद्रचाचांकडून अपहरण लावणारे लोकप्रतिनिधी आदिवासी खलाशांच्या सुरक्षेबाबत उदासीन का? हा प्रश्न येथील आदिवासींनी केला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: The safety of the commuters: on this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.