पनवेल पालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजप आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून केली निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:33 AM2021-02-03T00:33:22+5:302021-02-03T00:35:21+5:30

Panvel News : सत्ताधारी भाजप पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी बेशिस्त वागत आहेत. बैठकींना वेळेवर उपस्थित राहत नाहीत.

The ruling BJP is aggressive against the Panvel municipal administration | पनवेल पालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजप आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून केली निदर्शने

पनवेल पालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजप आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून केली निदर्शने

Next

पनवेल - सत्ताधारी भाजप पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी बेशिस्त वागत आहेत. बैठकींना वेळेवर उपस्थित राहत नाहीत. सत्ताधारी नगरसेवकांना योग्य मान देत नसल्याचा आरोप करीत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनाबाहेर निदर्शने करण्यात आली.

यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग अ समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे उपस्थित होते. मंगळवारी सत्ताधारी भाजपच्या वतीने दुपारी ३ वाजता बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पालिकेचे अधिकारी अर्धा तास उशिरा आले. यानंतरच्या बैठकीतदेखील हीच परिस्थिती होती. मासळी मार्केटमधील स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी या परिसरात खोटे उत्तर दिले असल्याचा आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला. 

यापूर्वी विधी विभागाच्या बैठकीतदेखील अधिकारी आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. महापौरांनादेखील हे अधिकारी मान देत नसून प्रशासनाचा या अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने या बेशिस्त अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर बसलो होतो. नगरसेवकांना हे अधिकारी जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न यावेळी सभागृह नेते ठाकूर यांनी उपस्थित केला. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीदेखील अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीचा यावेळी निषेध केला.

अधिकाऱ्यांची बेशिस्त वर्तणूक वाढत चालली आहे. अधिकारी महापौरांनाही जुमानत नाहीत. वेळेची बंधने पाळत नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर निदर्शने केली.
- परेश ठाकूर, सभागृह नेते

यासंदर्भात माझ्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यावर समस्या नक्कीच सोडविल्या जातील.
- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Web Title: The ruling BJP is aggressive against the Panvel municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.