खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, बंदूकधारी त्रिकुटाची दहशत; हवेत गोळीबार
By वैभव गायकर | Updated: July 29, 2024 09:44 IST2024-07-29T09:43:47+5:302024-07-29T09:44:34+5:30
घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही चोरट्यांनी रेनकोट, हेलमेट परिधान केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, बंदूकधारी त्रिकुटाची दहशत; हवेत गोळीबार
वैभव गायकर
पनवेल: खारघर सेक्टर 35 मधील बी एम ज्वेलर्सवर रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास तीन बंदूकधारी त्रिकुटाने दरोडा टाकला. या घटनेवेळी पळ काढताना या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला.संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नवी मुंबई शहरात यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या अत्याचाराविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असताना या चोरट्यांनी जणू नवी मुंबई पोलिसांना आव्हान देत शहरात दहशत माजवून हा दरोडा टाकला.
घटनेची नोंद खारघर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिन्ही चोरट्यांनी रेनकोट, हेलमेट परिधान केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान, पळ काढताना या चोरट्यावर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. खारघर शहरात मोबाईल चोर, मंगळसूत्र चोर यांची दहशत वाढली आहे. पोलिसांना या चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याने या घटना वाढत आहेत. या घटनेत चोरट्यांनी लाखोंचे दागिने देखील लंपास केले आहेत.