शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा मुद्देमाल परत

By admin | Updated: July 25, 2015 03:48 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील काही गुन्ह्यांत शोध लावण्यात

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील काही गुन्ह्यांत शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी वाशी येथील साहित्य मंदिरात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल परत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७८ तक्रारदारांना ३ कोटी ५२ लाख ३८ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये झालेल्या गुन्ह्यांमधून हाती आलेला माल न्यायालयाच्या परवानगीने संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.जप्त केलेल्या मालात ६५ लाख ७४ हजार ५४०रु. किमतीचे सोन्याचे दागिने, ३८ लाख ६० हजार किमतीचे चांदीचे दागिने, ६२ लाख ४५ हजार ५३० रुपयांची रोख रक्कम, ६ कार, १२ मोटारसायकल, ८० मोबाइल या वस्तूंचा समावेश होता. ७८ लाख ६५ हजार ८६ रुपयांचा सर्वात जास्त मुद्देमाल नेरुळ परिसरातून जप्त करण्यात आला. कळंबोली येथून चोरीला गेलेले संजय शहा यांचे ग्रेड स्टेनलेस स्टील कॉईल व प्लेट अशा एकण ४५ हजार ९५० किलो वजनाचे एकूण १ कोटी ११ लाख ४६ हजार २०० रुपयांचा माल परत करण्यात आला. वाशी येथील धीरज आहुजा यांचे ६७१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा २९ लाख ६० हजार किमतीचा ऐवज परत करण्यात आला. वाशी येथे राहणाऱ्या श्वेता राऊत यांच्या ३४ लाख रुपये किमतीच्या मर्सिडीज कारचाही यामध्ये समावेश होता तर, सीबीडी येथील व्हीक्टर पालुकारन यांना १३ लाख रुपयांची रोख रक्कम परत करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, गुन्हे शाखेचे सुरेश मेंगडे, विश्वास पांढरे, प्रशांत खैरे, शाखेचे सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, अरुण वालतुरे तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)