नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 12:04 IST2019-01-24T12:00:18+5:302019-01-24T12:04:19+5:30
नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांमधील नागरिकांना घरे खाली करण्यात आले होते.

नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांमधील नागरिकांना घरे खाली करण्यास सांगण्यात आलेले असताना तेथील जिल्हा परिषदेच्या शाळांचेही स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यास विरोध दर्शवत स्थानिकांनी स्थलांतराचे आदेश मागे घेण्याची मागणी करत आंदोलन केले.
स्थानिकांनी उलवे, तरघर, कोंबडभूजे, गणेशपुरी या रायगड जिल्हा परिषद शाळांची स्थलांतरीत बाबतचे आदेश मागे घेण्यासाठी शाळेतील मुलांसह पालकांनी पनवेल पंचायत समिती कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले.